जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधान दिनानिमित्त स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांना संविधानाची विस्तृत माहिती दिली. संविधान उद्देशिकेतील मूलभूत हक्क, कर्तव्य याविषयी विद्यार्थ्यांना ओळख करून दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनीही विविध स्वतंत्रता सेनानींच्या वेशभूषा साकारून आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुरेखा काबरा यांनी देखील विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिकेतीलबाबत विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
