जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला माल्यर्पण करण्यात आले. त्यानंतर मू. जे. महाविद्यालय, ओरियन सी.बी.एस.सी स्कूल, ए.टी झांबरे विद्यालय परिसरातील साफ सफाई करण्यात आली व महाविद्यालयीन परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी जगात शांततेसाठी आजच्या पिढीला महात्मा गांधींचे विचार आवश्यक आहे असे सांगितले. लाल बहादूर शास्त्री यांनी भारताच्या बिकट परिस्थितीत, भारताला अन्नधान्यासाठी स्वावलंबी केले आणि दुसरीकडे १९६५ मधील युद्ध जिंकून ‘जय जवान जय किसान’ चा नारा देत भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले, असे प्रतिपादन प्राचार्य अशोक राणे यांनी केले. विद्यार्थिनी हर्षदा पाटील हिने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रंजना सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मयूर गावित यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
