Headlines
Home » जळगाव » मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम योग अँड नॅचरोपॅथी मध्ये रक्त तपासणी शिबिर संपन्न

मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम योग अँड नॅचरोपॅथी मध्ये रक्त तपासणी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू.जे. महाविद्यालयाचे सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी मध्ये दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. थायरोकेअरच्या सहकार्याने हे शिबिर सवलतीच्या दरात सर्वसामान्य लोकांसाठी आयोजीत करण्यात आले होते.

रक्तातील ७२ घटकांची तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली आणि सहभागी सर्वांना त्यांचे रिपोर्ट वितरीत करण्यात आले. सदर शिबिरास जळगावकारांनी उदंड प्रतिसाद नोंदविला. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रा. सं.ना. भारंबे, संचालक डॉ. देवानंद सोनार, डॉ. हेमंत पाटील, डॉ. कुणाल झोपे, डॉ. डी.टी. नेहते, हेमंत काळे यांचे सहकार्य लाभले. तसेच प्रा. पंकज खाजबागे प्रा. अनंत महाजन, प्रा. श्रद्धा व्यास, गोविंद जाधव लीलाधर काकडे यांनी शिबिराच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!