जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : संस्कृत ही कालची भाषा नव्हे तर ही आजची भाषा आहे. कारण आज नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरा विषयक अभ्यासक्रम स्वीकारला गेलेला आहे. या अभ्यासक्रमाची माहिती घेत असताना पुन्हा आपल्याला संस्कृतकडे वळावे लागत आहे. कारण प्राचीन भारतीय साहित्य मग ते धार्मिक, वैज्ञानिक, भौतिक, आयुर्वेद, गणित शास्त्र, अथवा वास्तुशास्त्राबाबत असो सर्व साहित्य हे संस्कृत भाषेत उपलब्ध आहेत, असे विचार मूळजी जेठा महाविद्यालयाच्या संस्कृती विभाग व गीर्वाणवाणी मंडळ द्वारा संस्कृत साहित्य व भाषा कौशल्य या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात झारखंड धनबाद येथून आलेल्या डॉ. प्रतिभा आर्या यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना डॉ. आर्या म्हणाल्या की, संस्कृत साहित्य व भाषा कौशल्याबद्दल आपले विचार मांडताना म्हटले की आणि संस्कृत भाषा शिकल्याशिवाय किंवा त्यातून माहिती घेतल्याशिवाय आपण भारतीय ज्ञान परंपरेबद्दल विशेष माहिती देऊ शकत नाही. म्हणून मी म्हणते की, संस्कृत ही आजची भाषा आहे तशी उद्याचीही. जेव्हा वरील विषयावरील संशोधन होतील तेव्हाही संस्कृत भाषा अभ्यासली जाणार आहे म्हणूनही उद्याची ही भाषा आहे.
अध्यक्षीय भाषण देताना अशा प्रशाळेचे संचालक प्रो.भूपेंद्र केसूर म्हणाले की साहित्य हेच भाषेला जिवंत ठेवत असतात म्हणून या भाषेत जेवढे जास्त साहित्य लिहिलं जाईल तेवढी प्रगती संस्कृतीची होत राहील. यावेळी गीर्वाणवाणी मंडळाचे ही उद्घाटन करण्यात आले. अध्यक्ष सिद्धी उपासनी, उपाध्यक्ष जया पाटील तर सचिव जान्हवी पाटील यांची निवड व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अखिलेश शर्मा यांनी तर पाहुण्यांचे परिचय डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी करुन दिले. सूत्रसंचालन संस्कृत भाषेत कुमारी सिद्धी यांनी केले तर आभार जया पाटील यांनी मांडले. या कार्यक्रमात बहुसंख्य प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
