नाशिक ( वास्तव पोस्ट ) : शहरातील खुटवडनगर येथील मुख्य रस्त्याच्या कामाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकारामुळे अखेर सुरुवात करण्यात आली. याबाबत माकपच्या शहर सेक्रेटरी वसुधा कराड ॲडवोकेट तानाजी जायभावे सेतू संघटनेचे जिल्हाधिकारी सिताराम ठोंबरे यांच्या हस्ते मनपाचे उपाधिकारी कुमावत।यांना निवेदन देण्यात आले असता दुसऱ्या दिवसापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
आयटीआय सिग्नल ते माऊली लॉन्स पर्यंतचा रस्ता बीबीएम पद्धतीने तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी उपस्थित माकपाचे कार्यकर्ते रस्त्याचे कामांची गुणवत्ता तपासणी बाबत पाहणी करता सुपरवायझर राजू ढगे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेस रस्त्याचे दुरुस्ती करण हे बीबीएम पद्धतीने करण्यात येत आहे असे आढळले. यावेळी चर्चेत उपस्थित कार्यकर्ते कॉ. विजया टिक्कल, कॉ. छाया जाधव, कॉ. पांडुरंग काटकर, कॉ.बबन पालवे, कॉ. दत्ता राक्षे इत्यादी.
