जळगांव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने दत्तक गाव शिरसोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिरसोली गावचे सरपंच उषा अर्जुन पवार, अर्जुन पवार, बारी समाज माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आंबटकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे, बारी समाज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ बारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ.डी.आर. क्षीरसागर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.जी.व्ही. धुमाळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉक्टर रेड्डी यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व व पर्यावरण समतोल संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धुमाळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वर मांडोळे, निलेश बारी, लक्ष्मण माळी, मयूर भाई, यांनी विशेष श्रम घेतले.
