Headlines
Home » जळगाव » केसीई इंस्टिट्यूटमध्ये इन्फोसिसच्या सहकार्याने ‘संयुक्त प्रशिक्षण उपक्रम’ संपन्न

केसीई इंस्टिट्यूटमध्ये इन्फोसिसच्या सहकार्याने ‘संयुक्त प्रशिक्षण उपक्रम’ संपन्न

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये इन्फोसिसच्या सहकार्याने संयुक्त पंधरा दिवसीय प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला होता. सदर उपक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आय.एम.आर. चे संचालक प्रा. डॉ.बी.व्ही. पवार, डॉ.वर्षा पाठक, उदय चतुर आणि इन्फोसिसचे दीपेश हे प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी संचालक प्रा.डॉ.बी.व्ही. पवार विद्यार्थ्यांना या कौशल्याधिष्ठीत ज्ञानाचा उपयोग करिअरच्या विकासासाठी कसा करावा यासाठी मार्गदर्शन केले आहे. के.सी.ई.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विद्यार्थ्यांची ही प्रशिक्षणार्थीची चौथी बॅच प्रशिक्षित होऊन बाहेर पडत आहे. यातुनच आपले विद्यार्थी औद्योगिक आणि आयटी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सज्ज होतात आणि आपले करीयर उत्तम रीत्या घडवतात असे प्रा.पवार यांनी आपले मत व्यक्त केले.

सदर उपक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आय.एम.आर. चे संचालक प्रा डॉ.बी.व्ही. पवार, डॉ. वर्षा पाठक, उदय चतुर आणि इन्फोसिसचे दीपेश हे प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी संचालक प्रा.डॉ.बी.व्ही. पवार सरांनी विद्यार्थ्यांना या कौशल्याधिष्ठीत ज्ञानाचा उपयोग करिअरच्या विकासासाठी कसा करावा यासाठी मार्गदर्शन केले.

या उपक्रमाअंतर्गत MCA, BCA आणि IMCA च्या ५५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पुस्तके देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रशिक्षण आणि प्लेसमेंट प्रमुख पुनित शर्मा यांनी काम बघितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!