जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनंत चतुर्थीच्या निमीत्ताने आय एम आर रोटरॅक्टर्सनी आपला पालक क्लब, रोटरी क्लब जळगाव यांच्यासोबत निर्माल्य संकलन केले आणि आपले सोबतच भवतालच्या समाजाचेही पर्यावरणाचे भान जागृत ठेवले. निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्याचे हे रोटरॅक्ट क्लब आय एम आर चे सलग १५वे वर्षे आहे. २००९ ला हा उपक्रम आय एम आर मध्ये सुरू झाला. त्यावेळेचे रोटरॅक्ट अध्यक्ष विशाल संदानशीवे, निशांत धुगे, जयवर्धन नेवे, शंतनू अग्रवाल दिपाली पाटील, सयाजी जाधव अशा रोटरॅक्टच्या अनेक विद्यार्थी अध्यक्षांची परंपरा पुढे चालवत यावर्षीचे रोटरॅक्ट अध्यक्ष चिन्मय महाजनने देखील आपल्या टिमसह हा उपक्रम यशस्वी केला.
या टिम मध्ये प्रामुख्याने चेतना पाटील, कार्तिक पाटील, महिमा खैरे, तृप्ती पाटील, प्रज्ञा पाटील, मिलींद सोनवणे,राज चव्हाण, जयकुमार प्रजापत, ऋषी पाटील, हिमानी शर्मा, कल्पेश महाजन अथर्व वारूदकर या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
त्यांना के सी ई आय एम आरचे संचालक प्रा.डॉ.बी.व्ही. पवार तसेच रोटरी क्लब ऑफ जळगावचे अध्यक्ष ॲड. सागर चित्रे, सचिव पराग अग्रवाल, उद्योगपती रोटेरियन प्रेम कोगटा, पर्यावरण संवर्धन समितीचे चेअरमन सुभाष अमळनेरकर, प्रोजेक्ट चेअरपर्सन डॉ. शमा सुबोध, रोटरॅक्ट कमीटी चेअरमन जयेश ठाकुर, चंदन महाजन, सुबोध सराफ, कॅप्टन मोहन कुलकर्णी, डॉ.जयंत जहागीरदार यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी किशोर मंडोरा, जय नेवे, जितेंद्र ढाके, मुकेश महाजन, डॉ.तुषार फिरके, रितेश जैन, राजेश वेद, पंकज व्यवहारे, योगेश चौधरी, मनोज जोशी, विश्वजित बऱ्हाटे, संदिप शर्मा, नित्यानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
