Home » जळगाव » प्रा. डॉ. आनंद देशमुख यांच्या मार्गदर्शनात विधी महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन

प्रा. डॉ. आनंद देशमुख यांच्या मार्गदर्शनात विधी महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात विधी व्याख्यानमाले अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील प्रा. डॉ. आनंद देशमुख लाभले होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी.आर. क्षीरसागर, कार्यक्रम समन्वयक डॉ. विजेता सिंग हे होते. कार्यक्रमास प्रा. गणपत धुमाळे, डॉ. अंजली बोंदर, प्रा. शरद चौव्हाण, प्रा. बी.एस. पाटील, प्रा. स्वाती लोखंडे, प्रा. नितीन मटकरी, प्रा.ॲड. ज्योती भोळे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख यांनी भारतीय दंड संहितेची निर्मिती, काळानुरूप नवीन कायद्यांची आवश्यकता, नवीन व जुन्या कायद्यांचे फायदे तोटे, नवीन गुन्हे आणि नवीन कायद्यातील दोष यावर चिकित्सक मांडणी करून त्यावर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी प्रास्ताविक पर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी शुक्ला ने केले तर डॉ. विजेता सिंग यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!