जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्रात सालाबादप्रमाणे कलासाधनेत रममाण असलेला श्रीगणेश स्थापन करण्यात आला आहे. गणेश पूजेला कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, ओजास्विनी कला महाविद्यालय प्राचार्य मिलन भामरे, केसीई चे जनसंपर्क अधिकारी संदीप केदार, प्रा.पियुष बडगुजर, पुरुषोत्तम घाटोळ, दिगंबर शिरसाळे, ऋषीकेश इसाने, रितेश भोई, देवेंद्र गुरव, कपिल शिंगाणे, अजय शिंदे, रेडीओ मनभावनचे संचालक अमोल देशमुख आणि विदयार्थी उपस्थित होते.
