Home » महाराष्ट्र » कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर आठवड्याभरात तोडगा काढा ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर आठवड्याभरात तोडगा काढा ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील हजारो कंत्राटी कामगार आणि कर्मचारी विराट मोर्चाच्या माध्यमातून काल मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकारने या हजारो कंत्राटी कामगारांच्या मोर्चला सामोरे गेले नाहीत. त्यामुळे कंत्राटी कामगार प्रचंड चिडले. जो पर्यन्त कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढत नाही, तो पर्यंत आंदोलन थांबणार नाही. जर येत्या आठवड्या भरात सरकारने तोडगा काढला नाही, तर कंत्राटी कामगार तिव्र आंदोलन करणार. असा इशारा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे प्रमुख कामगार नेते कॉ.डॉ.डी.एल. कराड यांनी दिला.

शुक्रवारी राज्यातील हजारो कंत्राटी कामगार आणि कर्मचारी यांचा मोर्चा आझाद मैदानात आला होता. कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्राच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विविध कामगार संघटनाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी कंत्राटी कामगार नेते कॉ.मिलिंद रानडे,सिटूचे कॉ.डॉ.विवेक मोण्टेरो, इंटकचे गोविंदराव मोहिते, कॉ. उदय भट, कॉ.निवृत्ती धुमाळ, पालिका कामगार नेते अशोक जाधव, अंगणवाडी नेत्या कॉ. शुभा शमीम, संतोष चाळके, डॉ.ताप्ती मुखोपाध्याय, बुक्टू, विजय दळवी, मारुती विश्वासराव,आदि नेत्यांनी कामगारांना संबोधित केले. या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, आयटक, सिटू, टीयुसीआय, एआयआयइए, टीआयबी ए, बीफी, श्रमिक एकता संघ, कामगार एकता इतर संघटना सहभागी झाल्या होत्या.

कंत्राटी कामगारांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे हे विसरता कामा नये. कायम कामगारां एवढे किंवा जास्तच काम कंत्राटी कामगार करतात परंतु त्यांना कायम कामगारांच्या तुलनेत अत्यंत अल्प वेतनावर राबवून घेतले जाते. कॉ. डॉ. डी एल कराड म्हणाले,की कंत्राटी कामगार कर्मचारी यांना किमान वेतन दरमहा २६ हजार रुपये पगार मिळालाच पाहिजे. तसेच कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती देऊन त्यांना कायम करावे अन्यथा सरकारला कंत्राटी कामगारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असाही इशारा डॉ कराड यांनी दिला.

तसेच आमदार सचिन अहिर म्हणाले की, मी कंत्राटी कामगार होतो मग कायम झालो होतो. कंत्राटी कामगारांना कायम करण्याची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया मला माहिती आहे. त्यामुळे आता कंत्राटी कामगारांचा हा भव्य मोर्चा मंत्रालयावर घेऊन जायचे नाही, मंत्रालयच आझाद मैदानात आणायचे. तुम्हाला कसे कायम करत नाहीत बघुया. असा इशारा आमदार सचिन अहिर यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!