जळगाव ( वास्तव पोस्ट ) : हॉटेल सागर इन जालना येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा महाराष्ट्र राज्याचा राज्यव्यापी मेळावा थाटात संपन्न झाला. राज्यातील सर्व जिल्ह्यातून समितीचे पदाधिकारी असलेले राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका कार्यकारिणीतील पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर यांच्या शुभहस्ते मेळाव्याचा शुभारंभ दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मार्गदर्शन केले त्याबरोबरच पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या हक्काविषयी असलेल्या मागण्या मांडण्यात आल्यास त्या शासनाकडे मांडण्याचे आश्वासन देखील दिले.
सर्व महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, आणि जालना अशा एकूण २४ जिल्ह्यातील साधारण ३२९ पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात उपस्थिती नोंदवली.
महाराष्ट्र राज्य मेळाव्यात समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर यांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची स्थापना, संकल्पना, जडणघडण, ध्येय धोरण आणि स्थापनेपासून आजपर्यंतचा विकास याची माहिती दिली, त्याबरोबर माहिती अधिकार, पत्रकारिता आणि संघटनात्मक कार्यातून सामाजिक अन्यायाला वाचा फोडणे, प्रत्येक पदाधिकाऱ्याने समाजाभिमुख कार्याचा दृष्टीकोन ठेवून जास्तीतजास्त संघटन वाढीसाठी प्रयत्न करणे यासंदर्भात आपले मार्गदर्शन केले. समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड यांनी पत्रकारिता विषयावर मार्गदर्शन केले. समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष दीपराज इलमकार यांनी माहिती अधिकार, त्याची कार्यपद्धती, मांडणी, अर्ज करण्यापासून अपिलापर्यंत सर्व विषयावर मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पर्याय काय असतात याची देखील माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ रासवे यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा आणि दृष्टीकोन याचा कार्यभार समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सखारामपंत कुलकर्णी व समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर सालोडकर यांनी सांभाळला. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन समितीचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष काशिनाथ भालेराव यांनी सांभाळले त्याबरोबरच सर्व उपस्थितांचे आभार मानले.
विशेषतः दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले आपल्या सहकाऱ्यांसह कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी समितीच्या कार्याचा गौरव केला आणि लवकरच समितीसोबत आपल्या पत्रकार सहकार्यांसह जोडून घेण्याचा मानस व्यक्त केला.
समितीतील संघटनात्मक आणि सामाजिक जाणीवेच्या कार्याचा सन्मान आणि व्यक्तिगत क्षमतेनुसार जिम्मेदारीतील वाढ यादृष्टीने सचिन शेवाळे यांची महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदावर, जगन्नाथ रासवे यांची महाराष्ट्र राज्य संघटक पदावर, राहुल कुलकर्णी यांची उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष पदावर, संतोष लांडे यांची पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक पदावर, अभिजित क्षीरसागर यांची नागपूर जिल्हा अध्यक्ष पदावर, आसाराम वीरकर यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष पदावर, संतोष रासवे यांची जालना जिल्हा अध्यक्ष पदावर आणि किशोर गुडेकर यांची मुंबई जिल्हा संघटक पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत.
यावेळेस विशेषत्वाने समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सामाजिक, संघटनात्मक आणि माहिती अधिकार कार्याचा गौरव म्हणून जगन्नाथ रासवे, जगदीश बावस्कर, संतोष लांडे, सारंग महाजन, युवराज साळवे, रमेश बाहेती, राजेंद्र सतई, मनोज उराडे, शैलेश मालपुरे, आसाराम वीरकर, किशोर गुडेकर, समाधान पाटील, अशोक म्हस्के, राजू शिंदे, निवृत्ती गायके, अभिजित क्षीरसागर, दीपराज इलमकार, धनंजय ताटपल्लीवार, गणेश तारू, राहुल कुलकर्णी, स्वप्नील जोशी, शंकर शिंदे, सुरेश धारे, काशिनाथ भालेराव, महादेव सुरशे, ऋषिकेश सुरशे, रमेश सुरसे, गौरव काळे यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
समितीच्या कार्यात येणाऱ्या अनुभवाचे दृष्टीकोन राजेंद्र सतई, अभिजित क्षीरसागर, सारंग महाजन, रमेश बाहेती, आसाराम वीरकर यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र यांचे वाटप करण्यात आले.
