जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे “बारा बलुतेदार जिल्हा प्रतिनिधींची” एकत्रित बैठक प्रदेशाध्यक्ष कल्याण रावजी दळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली, मीटिंगचा मुख्य विषय होता बारा बलुतेदार व अठरापगड जाती यांच्या एल्गार यात्रेनिमित्त, ऋणमोचन येथून ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या हप्त्यात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतीला अभिवादन करून २७ दिवस ३३ जिल्ह्यांचा प्रवास करत व जनजागृती करत बारा बलुतेदार १८ अलुतेदार व मायक्रो ओबीसी यांना प्रत्येक सरकार हे दुर्लक्षित करत असतात, व मतांसाठी त्यांचा वापर करत असतात. फक्त या विषयांमध्ये बदल होऊन आम्ही सरकार बनविणारे आहोत आमचा राज्यसत्तेत हक्क आहे तो आम्हाला मिळावा ही व्यापक भूमिका घेऊन जनजागृती करत ही एल्गार यात्रा २७ दिवसाच्या प्रवासानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी मुंबई येथे समारोप होणार आहे.
यानिमित्ताने गुरूंचे शिष्यांशी असलेले नातं अधोरेखित केले जात आहे, या एल्गार यात्रेचा जळगाव जिल्ह्यात प्रवेश होत असताना सुमारे २००० बलुतेदार समाज बांधव व भगिनी यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करणार आहे व या यात्रेला जिल्ह्याचे वेशीपर्यंत सोबत करणार आहेत, या विषयावर आणखीन प्रदीर्घ चर्चा करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार समाजाचे प्रतिनिधी दिनांक १६ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता “सैनिक हॉल महाबळ कॉलनी” येथे एकत्रित जमणार आहेत व एल्गार यात्रेची दिशा व नियोजन पक्के करणार आहे.
आजच्या बैठकीला विभागीय अध्यक्ष मुकुंद मेटकर, प्रदेश सदस्य ईश्वर मोरे, जिल्हाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष सखाराम जी मोरे, जिल्हा महिला अध्यक्ष भारती कुमावत, महानगर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, महानगर महिला अध्यक्ष छाया कोरडे, सुतार समाजाचे प्रतिनिधी संजय शिरसाट, चर्मकार समाजाचे प्रतिनिधी खैरनार, कोष्टी समाजातर्फे अशोक भाऊ कोष्टी, नाभिक समाजातर्फे देविदासजी फुलपगारे, प्रदेश सदस्य नाना बोरनारे, प्रदेश सदस्य भवर, विजय वानखेडे संजय विसपुते, पुनम खैरणार आदी मान्यवर प्राथमिक बैठकीस उपस्थित होते. पुढील बैठक दि.१६ ऑगस्ट रोजी ११-००वा सैनिक हॉल येथे होईल.
