Headlines
Home » जळगाव » हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर तापी नदीपात्रात ५५३०३ क्युसेक्स एवढा विसर्ग

हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर तापी नदीपात्रात ५५३०३ क्युसेक्स एवढा विसर्ग

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. सध्या हतनूर धरणातून ५५३०३ क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणावर तो विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. धरण परिसरातील गावांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नदीपात्रातील विसर्गामुळे तापी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने, तापी नदीकाठच्या नागरीकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन तापी पाटबंधारे विकास महामंडळ व जिल्हा प्रशासन, जळगांव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!