जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आज दि.२६ जुलै २०२४ शुक्रवार रोजी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले.
सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येत आहे. आजचा पाचवा दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका प्रतिभा तुळशीदास सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे कापडी व कागदी पिशव्या तयार केल्या.
त्यानंतर LCD प्रोजेक्टरवर प्रथमोपचार व प्रथमोपचार पेटीतील साहित्य तसेच प्रथमोपचाराच्या वेळी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दाखविण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिता शिरसाठ तर आभार रत्ना चोपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
