Home » जळगाव » ए.टी. झांबरे विद्यालयात गुरुपुजन

ए.टी. झांबरे विद्यालयात गुरुपुजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमानिमित्त महर्षी वेदव्यास-पूजन व गुरु पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन, प्रास्ताविक, कथाकथन आणि आभार सर्व काही इयत्ता १० वी ब मधील सृष्टी कुलकर्णी, सिध्दी मेटकरी, भार्गवी भंगाळे, निमिषा नेहेते, दामोदर चौधरी, पार्थ सोनवणे, वेदांत पवार या विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमात ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना, तसेच गुरुभक्तीवर आधारित प्रेरणादायी कथाकथन, संस्कृत गीतगायन व स्तोत्र-पठन केले. मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी मार्गदर्शन केले. भारताला विश्वगुरु बनवायचे असेल, तर प्रत्येकाने स्वतः चे १००% योगदान देणे गरजेचे आहे. तसेच श्रद्धा, निष्ठा आणि समर्पणची भावना वृद्धिंगत करा, असे मार्गदर्शन झांबरे यांनी केले.

पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांनी गुरुच्या उपदेशाचा जीवनात वापर करा, असा संदेश दिला. कार्यक्रमाबाबत शाळेचे संस्कृत शिक्षक वेदप्रकाश गडदे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मराठी विषय शिक्षिका वर्षा चौधरी व मनीषा जयकर उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!