Home » महाराष्ट्र » वादग्रस्त पूजा खेडकर पहिल्यांदाच थेट बोलल्या ; ‘आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी आरोपी नाही’

वादग्रस्त पूजा खेडकर पहिल्यांदाच थेट बोलल्या ; ‘आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी आरोपी नाही’

POOJA KHEDKAR : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आलेले आरोप मीडिया जनतेसमोर मांडत आहे. मात्र कोणी काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी कमिटीसमोरच मांडणार आहे, असं पूजा खेडकर यांनी स्पष्ट केलं.

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पूजा खेडकर प्रशिक्षणार्थी असताना स्वत:साठी कॅबिन आणि महागड्या गाडीवर सरकारी दिव्याची मागणी, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्न जास्त असतानाही क्रिमिलेअर प्रमाणपत्रामुळे त्यांच्या चौकशीसाठी कमिटी नेमली आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यावर पूजा खेडकर माध्यमांसमोर बोलायला नकार देत होत्या.

दरम्यान त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्यावर अने्क आरोप करण्यात आले आहेत. मात्र भारताच्या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे की, जोपर्यंत एखाद्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत ती व्यक्ती आरोपी होत नाही”, असं पूजा खेडकर म्हणाल्या. मीडियामध्ये जे काही आरोप करण्यात येत आहेत त्यावरही माझं म्हणणं कमिटीसमोरच मांडणार असल्याचं खेडकर यांनी सांगितलं. माझ्यावर जे काही आरोप केले गेले आहेत त्याचं उत्तर मी नेमलेल्या कमिटी समोर मी सादर करणार आहे. याबाबत जे काही दस्तावेज असतील किंवा सर्टिफिकेट असतील मी ते कमिटी समोर मांडणार आहे. असं पूजा खेडकर यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान पूजा खेडकर यांचा दिव्यांग प्रमाणपत्रासाठी करण्यात आलेला अर्ज औंध जिल्हा रुग्णालयाकडून फेटाळण्यात आला होता. पूजा खेडकर हिने औंध जिल्हा रुग्णालयाला अर्ज दाखल करण्यापूर्वी आणखीही दुसऱ्या ठिकाणी अर्ज दाखल केला असल्यामुळे संगणक प्रणालीत तो आपोआप फेटाळण्यात आल्याचं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीनिवास यांनी स्पष्ट केलं. पूजा खेडकर यांना कोणत्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले, याबाबतची कागदपत्रे घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून तपासणी सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!