Home » जळगाव » मू.जे.महाविद्यालयात ‘मेघ दाटुनी येता…’ काव्यवाचन रंगले

मू.जे.महाविद्यालयात ‘मेघ दाटुनी येता…’ काव्यवाचन रंगले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित कान्ह ललित कला केंद्र व स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सभागृहात ‘मेघ दाटूनी येता… चिंब पावसाच्या कविता’ हा काव्य वाचनाचा कार्यक्रम रंगला. यात मराठीतील सुप्रसिद्ध कवींच्या पावसावर आधारित कवितांचे गायन व अभिवाचन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक आणि कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी कविता सादर केल्या. यावेळी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. आर बी.ठाकरे, प्रा. स्वाती बऱ्हाटे, प्रा.उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे लेखन व निवेदन गणेश सूर्यवंशी यांनी केले. तर काव्य अभिवाचन श्रद्धा पाटील व गायन इशा वडोदकर यांनी केले.

या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी यांची ‘पेरणी’, बा.सी मर्ढेकर यांची ‘किती तरी दिवसात’, बा.भ. बोरकर यांची ‘सरीवर सरी आल्या ग’, ना. धों. महानोर यांनी ‘मन चिंब पावसाळी’, रविचंद्र हडसनकर श्रावण महिना आला की’, बालकवी यांची ‘फुलराणी’ , ‘श्रावण मासी’, शांता शेळके यांची ‘आला पाऊस मातीच्या वासात ग’, इंदिरा संत यांची ‘नको नको रे पावसा’ सौमित्र इत्यादी कवींच्या कवितांचे काव्यवाचन व गायन करण्यात आले. यशस्वितेसाठी प्रा. प्रसाद देसाई, संदीप वानखेडे, प्रा. प्रवीण महाजन, प्रा.संदीप गव्हाळे, विजय जावळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शहरातील काव्यरसिक तसेच विद्यार्थी व प्राध्यापक आदींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!