Headlines
Home » जळगाव » देशभरात लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांविषयी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे जन जागृती कार्यक्रम

देशभरात लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांविषयी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे जन जागृती कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर तीन नवीन कायद्यांबाबत जन-जागृती निमित्ताने आज दि.२ रोजी सकाळी ८:०० ते ०९:४५ वाजे दरम्यान जळगांव शहरातील ला.ना. विद्यालय, नंदिनी बाई मुलींचे विद्यालय, प्रगती विद्यालय आणि अँग्लो उर्दू हायस्कूल मधील जवळजवळ ३०० विद्यार्थांना जिल्हा पोलीस स्टेशन आवारात नवीन कायद्यांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.

त्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशन पासून रिंग रोड मार्गे गणेश कॉलनी परिसरातील नागरी वस्तीतून जन-जागृती रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत विद्यार्थ्यांसोबत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, ४० अंमलदार व PHQ चे बँड पथक सहभागी झाले होते. रॅली संपल्यानंतर यावेळी सर्वांना चहा व खाऊ देण्यात आला.

लागू करण्यात आलेल्या नवीन कायद्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यांनुसार काही कलम हटवण्यात आले असून काही नवीन कलम जोडण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!