Home » क्रीडा » T-20 WC :इंग्लंडला फिरकीच्या जाळयात १०३ धावांत गुंडाळत टीम इंडियाची फायनल मध्ये धडक

T-20 WC :इंग्लंडला फिरकीच्या जाळयात १०३ धावांत गुंडाळत टीम इंडियाची फायनल मध्ये धडक

IND vs ENG T20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आज टी 20 विश्वचषकामध्ये गतविजेता इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव करत, फायनल मध्ये प्रवेश केला आहे. आता अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेसोबत लढत होईल.

गयाना ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गयाना या स्टेडियमवर टी20 विश्वचषकातील सेमीफायनलचा दूसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे हा सामना रंगला होता. टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वात या मैदानावर इंग्लंडसमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये धडक दिली.

भारतानं दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ सर्वबाद १०३ धावाचं करु शकला. त्यामध्ये कर्णधार जोस बटलर २३, हॅरी ब्रूक २५, जोफ्रा आर्चरच्या २१ धावांच्या जोरावर इंग्लंडनं १० गडी गमावून १०३ धावा केल्या. भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने बटलरला बाद करत विकेट्सची सुरुवात केली. भारतासाठी फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी ३-३ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह २ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी इंग्लंडनं टाॅस जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात भारतानं इंग्लंडसमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मानं ३९ चेंडूत सर्वाधिक ५७ धावांची खेळी खेळली. यादरम्यानं त्यानं ६ चौकारांसह २ उत्तुंग षटकार ठोकले. तर सूर्यकुमार यादवने ४७ धावांच्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. हार्दिक पांड्या २३, रवींद्र जडेजा १७ धावांच्या जोरावर भारतानं ७ गडी गमावून १७१ धावा ठोकल्या होत्या.

इंग्लंडसाठी ख्रिस जाॅर्डननं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले, सॅम करन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

या सामन्यात फिरकीपटू अक्षर पटेलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. इंग्लंडला पराभूत करुन भारताने फायनलसाठी तिकीट पक्क केले असुन २९ जून भारत फायनलमध्ये रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!