Headlines
Home » आरोग्य » सरकारने केल्या ४१ औषधांच्या किंमती कमी ; सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा

सरकारने केल्या ४१ औषधांच्या किंमती कमी ; सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा

नवी दिल्ली | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – केंद्र सरकारने काही औषधांच्या किंमती ह्या कमी करण्याचा मोठा निर्णय घेतल्याने गरीब व मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या औषधांमध्ये अनेक महत्त्वाच्या आजारांवरील औषधांचाही समावेश आहे.

किंमत कमी केलेल्या औषधीमध्ये मधुमेह, हृदय आणि यकृतशी संबंधित असणाऱ्या आजारांवर वापरल्या येणाऱ्या ४१ औषधांच्या आणि सहा फॉर्म्युलेशनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या झालेल्या १४३ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ह्या बैठकीत जवळपास ४१ औषधांच्या किंमती कमी केल्या आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी यांनी एक अधिसूचना जारी करून फार्मा कंपन्यांना विविध औषधांच्या कमी किमतींची माहिती डीलर्स आणि स्टॉकिस्टना देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जगात मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. १० कोटींहून अधिक मधुमेही रुग्ण, तसेच देशातील ८ कोटींहून अधिक लोकांना बीपीचा त्रास आहे. जवळजवळ ३० कोटींहून अधिक लोकांना या औषधांच्या किंमती कमी केल्याने दिलासा मिळणार आहे. कमी केलेल्या किंमतीमध्ये अँटासिड्स, मल्टीव्हिटामिन्स आणि अँटीबायोटिक्सचा या औषधांचाही समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!