नाशिक | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – काल घाटकोपर येथे अनाधिकृत होर्डिंग कोसळल्यामुळे १४ लोक मृत्युमुखी व ७५ पेक्षा जास्त जखमी झालेत. जाहिरातबाजीसाठी या लोकांचा बळी गेला.
यापूर्वी पुण्यातही अशी घटना होऊन सहा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आता वेळ आली आहे विचार करण्याची. याला जबाबदार कोण? महानगरपालिका प्रशासन ? राज्यातले सत्ताधारी ? की बाजारी व्यवस्था ? का तिघेही !
कशाला हवेत होर्डिंग आणि कशाला हवी जाहिरातबाजी. किमान माणसांचा जीव वाचवण्यासाठी तरी हे अधिकृत आणि अनाधिकृत होर्डिंग बंद करा. अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या वतीने माकप नेते आणि राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ.डी. एल. कराड यांनी केली आहे.
