Home » आरोग्य » कोरोनाचा नवा व्हेरियंट केपी २ (फ्लर्ट) हा राज्यात दाखल

कोरोनाचा नवा व्हेरियंट केपी २ (फ्लर्ट) हा राज्यात दाखल

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात कोरोनाचा जेएन १ नंतरचा नवा व्हेरियंट केपी २ (फ्लर्ट) हा दाखल झाला असून या नव्या व्हेरियंटचे राज्यात आतापर्यंत एकूण ९१ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, जे लोक आधीच मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयविकार यांसारख्या इतर आजारांनी त्रस्त आहेत त्यांनी काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

आतापर्यंत नव्या व्हेरियंटच्या जे ९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत या रुग्णांपैकी पुण्यात ५१, ठाण्यात २०, अमरावतीमध्ये ७, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७, सोलापूरमध्ये २, अहमदनगर, नाशिकम, लातूर आणि सांगलीमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

शनिवारी राज्यात ४ नवीन कोविड रुग्ण आढळून आले होते. त्यात मुंबईत ३ आणि नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. नव्या व्हेरियंटचे जिनोम सिक्वेन्सिग हे महिनाभरापूर्वीचे असून या व्हेरियंटचा कोणताही धोका नसल्याने साथरोग सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!