जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा इंडिया आघाडीचे नेते अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्याच्या निर्णयाचे स्वागत माकपा नेते डॉ. डी एल कराड यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारने अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कट करुन अटक केली व तुरुंगात टाकले.
अरविंद केजरीवाल यांना अटक हा विरोधी पक्षांवर व लोकशाही हक्कावर सर्वात मोठा हल्ला होता. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे ते आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकतील. यामुळे आता लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई शंभर टक्के जिंकणे सहज शक्य आहे. भाजपचा आणि मित्र पक्षाचा पराभव अटळ असुन देशात परिवर्तन होणार असेही डॉ. कराड म्हणाले.
