Home » राजकीय » पिंपळगाव हरेश्‍वर येथे वैशालीताई यांनी क्षीरसागर व खाटीक यांचे केले शिवसेना-उबाठात स्वागत

पिंपळगाव हरेश्‍वर येथे वैशालीताई यांनी क्षीरसागर व खाटीक यांचे केले शिवसेना-उबाठात स्वागत

पाचोरा | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग होत असून आज देखील तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथील दोन मान्यवरांनी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून पक्षात प्रवेश घेतला आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या आठवड्यात मातोश्रीवर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेकडो पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले होते. यानंतर, आज पिंपळगाव हरेश्‍वर येथील भारत क्षीरसागर आणि अनिसभैय्या खाटीक यांनी पक्षात प्रवेश घेतला आहे.

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी या दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले. आगामी काळात पक्षाच्या कार्यात झोकून देऊन काम करण्याची ग्वाही या दोन्ही मान्यवरांनी याप्रसंगी दिली. तर, आगामी दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारात सक्रीय राहणार असल्याचे देखील ते म्हणाले.

या प्रवेश सोहळ्याच्या प्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत कोमल आबा, अनिससेठ बागवान, कैलास आप्पा, राजधर आबा पाटील, बापू पाटील, हमीदखान पठाण, प्रितेश जैन, भागवत पाटील, अजय कडूबा पाटील, अजय तेली, देविदास महाजन, देविदास पाटील, रामाबाबू आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!