Headlines
Home » क्रीडा » विशाल पाटील याची जागतिक फ्लोरबॉल चॅम्पियनशिपसाठी संघात निवड

विशाल पाटील याची जागतिक फ्लोरबॉल चॅम्पियनशिपसाठी संघात निवड

जळगाव | दि.२(वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी विशाल पाटील याची फिनलंड येथे होणाऱ्या जागतिक फ्लोरबॉल चॅम्पियनशिपसाठी भारतीय फ्लोरबॉल संघामध्ये निवड करण्यात आली. या निवडीमुळे विशाल पाटील याचा एस एस मणियार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पहूजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, डॉ. अंजली बोंदर, प्रा. शरद चव्हाण, प्रा. बी. एस. पाटील, डॉ. ललिता सपकाळे, प्रा. स्वाती लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी फ्लोरबॉल चॅम्पियनशिप तसेच पुढील वाटचालीसाठी विशाल यास शुभेच्छा दिल्यात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!