Home » राजकीय » रामटेक लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द ; काँग्रेसला मोठा झटका

रामटेक लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द ; काँग्रेसला मोठा झटका

नागपूर | दि. २८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जात पडताळणी समितीने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणि महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. शिवसेनेचा विद्यमान खासदार असतानाही मविआत काँग्रेसने रामटेकच्या जागेवर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता.

रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. परंतु रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २७ मार्च रोजीच संपली आहे.

दरम्यान, रश्मी बर्वेंच्या एबी फाॅर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांच्या पतीचे नाव देण्यात आले होते. रश्मी बर्वेंचं प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे पर्यायी उमेदवार म्हणून आता श्यामकुमार बर्वे हे रामटेकमधून मविआ तर्फे काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजू पारवे हे उमेदवार आहे. त्यामुळे श्रीयुत पारवे विरुद्ध श्रीयुत बर्वे असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!