Headlines
Home » क्रीडा » टोणगांव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न

टोणगांव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न

भडगाव | दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– टोणगांव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्षा मिना बाग, मुख्याध्यापिका मिरा साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

रांगोळी स्पर्धेत सहभागी महिला पालकांनी मोठ्या संख्खेने सहभाग नोंदविला होता. अनुक्रमे प्रथम क्रमांक रंजना मोरे, द्वितीय जया राजपूत, तृतीय कविता भोई, उत्तेजनार्थ मनीषा तडवी, सरला जाधव, पूजा पाटील हे बक्षिसाचे मानकरी ठरले. माधुरी वाडेकर, वर्षा शिरसाठ आदि सहभागी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. महिलांनी महिला सक्षमीकरणासाठी विविध उद्योग व्यवसाय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक योजना पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मिरा साळुंखे, ज्योती साळुंखे, मंदाकिनी पाटील, प्रकाश पाटील यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सुषमा पाटील व आभार सुवर्णलता पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!