पुणे | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन महाराष्ट्रातून मुंबई- गांधीनगर दरम्यान सुरु झाली होती. त्यानंतर राज्यातील मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबईवरुन शिर्डी, मुंबई-गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. देशात आणखी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहे. त्यातील दोन एक्स्प्रेस महाराष्ट्रातून सुरु होणार आहे. पुणे शहरातून २ नवीन वंदे भारत रेल्वे सुरू होत आहे. त्यासाठी १२ मार्च रोजी महाराष्ट्र राज्याला पुण्यासाठी या दोन गाड्या मिळणार आहे. पुणे-बडोदा आणि पुणे-सिकंदराबाद या मार्गावर नव्या २ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
देशातील धार्मिक स्थळांवर भाविकांच्या प्रवासाच्या सुविधेसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केली जात आहे. अयोध्या रेल्वे स्थानकावर देशातून अनेक ठिकाणांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस येत आहेत. महाराष्ट्रात शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत. आता पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव या दोन वंदे भारत सुरु करण्याचे नियोजन सुरु आहेत.
अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनच्या बैठे व्यवस्थेनंतर आता लवकरच लोकांना वंदे भारत ट्रेनचे स्लीपर कोचमध्ये देखील मिळणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर ट्रान्झिटच्या कार बॉडी स्ट्रक्चरचे उद्घाटन केले. बेंगळुरूमध्ये वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर प्रोटोटाइपची निर्मिती होत आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये राजधानी एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा चांगल्या सुविधा असणार आहे. एकूण १० वंदे भारत स्लीपर ट्रेनचा सेट तयार करण्याचे काम सुरु आहे.
