मुंबई | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज ओबोसी प्रवर्गातुन मराठा समाजाला आरक्षण आणि सगेसोयरेची अंबलबजावणी केली जात नाही म्हणून अतिशय आक्रमक शैलीत निर्णायक बैठक घेतली . यावेळी त्यांनी समाजाला संबोधित केले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र होत आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. आपल्याला जीवे मारण्याचा कट देवेंद्र फडणवीस यांनी रचल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.
“मला सलाईनमधून विष पाजून मारण्याचा कट रचला असुन , त्यामुळेच मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मला मारायचंच असेल, तर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवा”, असं आव्हान जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलं आहे
