मुंबई | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सध्या देशभरात होणाऱ्या ईव्हीएम विरोधी रॅली व आंदोलनावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देशामध्ये निवडणुकीत ईव्हीएम च्या वापरा विषयी त्यांचे मत विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, “मी जे बोलतो ते त्याक्षणी कटू वाटतं तरी कालांतराने लोकांना ते पटतं. मग ते मराठा आरक्षणाबद्दल असो वा ईव्हीएमबद्दल. जगभर सर्व प्रगत देशांमध्ये जर मतदान मतपत्रिकेवर होत असेल तर ते भारतातच ईव्हीएमवर का ?”
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरुन वरून ईव्हीएम बाबत त्यांचा रोख स्पस्ट दिसून आला. यामुळे आता यापुढे ईव्हीएम विषयी मनसेची भूमिका काय असणार याची उस्तुकता लागून आहे .
