Home » महाराष्ट्र » पुण्यामध्ये थंडीचा जोर वाढला ; राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

पुण्यामध्ये थंडीचा जोर वाढला ; राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

पुणे, दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) पुणे येथे थंडीचा जोर कमी झाला , असे वाटतं असतांना शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना थंडीचा कडाका जाणवला. अचानक गारठा वाढल्याने नागरिकांनी थंडीचा आनंद घेतला. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज वातावरणात अचानक गारवा वाढला, दुपारी मात्र उन्हाची तीव्रता जाणवली. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद पुणे येथे झाली.पुण्यात शुक्रवारी किमान तापमान ११.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

वातावरणातील अनुकूल घडामोडी आणि उत्तरेकडील वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्याच्या काही भागात सलग दुसऱ्या दिवशी किमान आणि कमाल तापमानात किंचित घट नोंदविण्यात आली. गुरुवारी रात्रीनंतर गारठा वाढला होता आणि पहाटे कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली. दुपारी बारानंतर मात्र ऊन वाढले होते. दिवसभरात ३२.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस सकाळी गारठा राहण्याचा अंदाज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!