जळगाव , दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जळगाव येथील शिवाजी नगर धनाजी काळे नगर सेवा वस्तीत केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री प्रदिप पाटील यांनी केले. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थी ऋषिकेश पवार याच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर श्री प्रदिप पाटील यांनी आपले मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्या बद्दल मार्गदर्शन केले. व समतोल प्रकल्पाचे कार्य समजून सांगितले. त्या नंतर समतोल टीम सदस्य यांच्या हस्ते बालकांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित पुष्पांजली बहुउद्देशीय मित्र मंडळ चे करन भगत, गणेश सानप, कुणाल मराठे, लखन पवार, महेश शिंदे व परिसरातील युवक व समतोल प्रकल्पाचे टीम सदस्य प्रशांत चौधरी, रविना भगत यांच्या समवेत कार्यक्रम संपन्न झाला.
