Headlines
Home » राष्ट्रीय » खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्ली येथे अपघात ; गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्ली येथे अपघात ; गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

नाशिक, दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– नाशिकचे शिंदे गटाचे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झाला आहे. राजधानी दिल्लीतील बी डी मार्गावर ही दुर्घटना घडली. या अपघातात हेमंत गोडसे यांना विशेष दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान हेमंत गोडसे हे संसदेतील शिवजयंती उत्सव आटोपून ते इनोव्हा या गाडीने आपल्या निवास्थानी जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून एका वाहनाने जोरदार धडक दिली. यात इनोव्हा गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात हेमंत गोडसे यांच्यासह त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोनदा विजय मिळवला होता. मात्र २०२२ मध्ये गोडसे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेत. आता २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत पुन्हा एकदा त्यांना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!