Home » जळगाव » भुसावळ शहराला ४४२ सीसीटीव्ही नजरेतून देखरेख ; जिल्हा नियोजनकडून निधीस मंजूरी

भुसावळ शहराला ४४२ सीसीटीव्ही नजरेतून देखरेख ; जिल्हा नियोजनकडून निधीस मंजूरी

भुसावळ, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )- जिल्हा नियोजन मधून भुसावळ शहरातील सीसीटीव्हीसाठी चार कोटीचा निधी मंजूर झाला आहे . भुसावळ शहराला ४४२ सीसीटीव्ही नजरेतून देखरेख , तसेच वाहनांचे क्रमांकही स्कॅन होणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून आणि आ.संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या चार कोटींच्या निधीतून भुसावळ शहरातील बाजारपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसणार आहेत. त्यापैकी ३१९ कॅमेरे बाजारपेठ, तर १२३ कॅमेरे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसवण्याचा प्रस्ताव आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे धावत्या वाहनांच्या नंबर प्लेटचे स्कॅनिंग, ३६० अंश व नाईट मोडवर सुस्पष्ट चित्रीकरण हे नवीन कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य असेल. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी हे कॅमेरे पोलिसांसाठी मोठे सहायकारी ठरणार असल्याची माहिती भुसावळचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.

भुसावळ हे शहर मिश्र लोकवस्तीचे शहर आहे. शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी गेल्या६ महिन्यापासून व्यक्तिशः पाठपुरावा सुरू होता. त्याला आता यश आले आहे. भुसावळ शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन मधून ४कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नागरिकांची सुरक्षा विशेषतः महिला सुरक्षा,पोलिसांचा गुन्हे तपास, गुन्हे प्रकटीकरण,गुन्हे प्रतिबंध तसेच कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे इत्यादीमध्ये या सीसीटीव्ही प्रकल्पाचा हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया आमदार संजय सावकारे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!