Headlines
Home » महाराष्ट्र » देशातील पहिली ‘स्वच्छ भारत अकादमी’ ठाण्यात शासकीय तांत्रिक विद्यालयात सुरू करणार

देशातील पहिली ‘स्वच्छ भारत अकादमी’ ठाण्यात शासकीय तांत्रिक विद्यालयात सुरू करणार

ठाणे, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातंर्गत ठाण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालय येथे देशातील पहिली ‘स्वच्छ भारत अकादमी’ सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि बीव्हीजी भारत विकास ग्रुप यांच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. हा उपक्रम स्वच्छता व स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘शिक्षण आणि कौशल्य विकासाचे’ महत्त्व अधोरेखित करणारा आहे. स्वच्छ भारत अकादमीचा शुभारंभ हा आपल्या स्वच्छता आणि कौशल्य विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे .

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा,उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगूरू डॉ. अपूर्वा पालकर, भारत विकास ग्रुप- बिव्हीजीचे हणमंत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!