जळगाव कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परीक्षा विभाग संचालक योगेश पाटील
विद्यार्थ्यांचे आयुष्य एका निकालावर वळण घेत असते. त्या निकालामागे असते अनेकांचे श्रम, पण त्या संपूर्ण प्रक्रियेचा कणा असतो — परीक्षा विभाग. आणि त्या विभागाचे नेतृत्व जर प्रामाणिक, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हाती असेल, तर हजारो विद्यार्थ्यांच्या मनातील भीती आपोआप विश्वासात बदलते.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक योगेश पाटील हे नाव आज केवळ एक पद नाही, तर विश्वासाचं प्रतीक बनलं आहे.
मोठं मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात, तांत्रिक अडचणींमध्ये, विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा ढिगारा असताना देखील त्यांनी कधीही “नियम आड येतो” असा पळ काढला नाही. उलट, नियमांच्या चौकटीत राहून विद्यार्थ्यांना न्याय कसा देता येईल, याचा सतत विचार केला. अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून निकाल, पुनर्मूल्यांकन, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र यांसारख्या विषयांवर त्यांनी वैयक्तिक लक्ष दिले.
आजही अनेक विद्यार्थी म्हणतात,
“सर भेटले, बोलले… आणि अर्धी समस्या तिथेच सुटली.”
हे वाक्य एखाद्या अधिकाऱ्याला मिळालेलं सर्वात मोठं पारितोषिक आहे.
परीक्षा विभाग म्हणजे केवळ कागदपत्रांची फाईल नव्हे, तर लाखो स्वप्नांची जबाबदारी असते. ती जबाबदारी पार पाडताना योगेश पाटील सरांनी मानवी संवेदना जपल्या, विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान जपला आणि विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला तडा जाऊ दिला नाही.
आज प्रशासनात जिथे “वेळ नाही”, “सिस्टम स्लो आहे”, “उद्या या” अशी उत्तरं सहज ऐकू येतात, तिथे योगेश पाटील सरांनी “विद्यार्थी केंद्रस्थानी” ही भूमिका प्रत्यक्ष कृतीतून दाखवली.
विद्यार्थ्यांचे आई-वडील, ग्रामीण भागातून आलेली मुलं, आर्थिक अडचणीत असलेले अभ्यासू विद्यार्थी — सगळ्यांसाठी त्यांनी एकच मापदंड ठेवला: न्याय.
अशा अधिकाऱ्यांमुळेच विद्यापीठ केवळ शिक्षणाचं केंद्र राहत नाही, तर विश्वासाचं मंदिर बनतं.
योगेश पाटील सरांना मनापासून सलाम —
आपण केवळ परीक्षा घेत नाही,
आपण भविष्य घडवता…
दिपक जाधव
साप्ताहिक वास्तव पोस्ट संपादक

श्री.योगेश पाटील साहेब म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, कसलेलं व्यक्तीमत्व, मात्र या काळात अशा दुर्मिळ लोकांची दखल घेतली जात नाही. हुजरेगिरी आणि चाटुगीरी करणार्यांना अवास्तव महत्त्व दिले जाते.
मी अशोक बच्चन खैरनार विद्यार्थी किंवा कॉलेज बुद्धिमान विद्यालय जळगाव या वर्षापासून म्हणजे नेहमीच पाणी चार सेमिस्टर मध्ये मला विद्यापीठ सी मी नियमितपणे योगेश पाटील सरांची नियमितपणे मी पत्रव्यवहार व आरटीआय च्या रूपाने अर्ज केली की सर माझ्यावर दोन्ही होत आहे त्याचे निवारण करा मी मागील दोन वर्षापासून पेपर देत असून सर्व पेपर्स नोट्स प्रमाणे लिहीत आहे आणि 28 ते 30 पेक्षा मनमानीपणे प्राध्यापक लोक त्रास देण्याचा हेतूने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून मला फेल करत आहे मी तीन ते चार अर्ज माननीय योगेश पाटील सरांना केली परंतु त्यांनी कुठल्याही पाणी मला न्याय दिलेले नाही त्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे योगेश पाटील सरांची वावा करत आहे पण मला न्यायला मिळाल्या मुळे मला सरांमध्ये विशेष काही असं वाटलं नाही
मी श्री अशोक रूपचंद खैरनार विद्यार्थी मनियार लॉ कॉलेज जळगाव येथें मागील 2023 पासून एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आहे या मागील दोन वर्षापासून LLB प्रथम वर्षासाठी पेपर देत आहे परंतु सर्वच पेपर्स चांगला अभ्यास करून 28 ते 30 पेज पेपर्स लिहीत आहे व सर्व नोट्स प्रमाणे जसेचे तसे पेपर्स लिहून मला कॉलेजच्या प्राध्यापका मार्फत आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपल्या अधिकाराचा दुरु करून फेल करीत आहेत मी विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे नियंत्रक माननीय योगेश पाटील सर यांना चार ते पाच एप्लीकेशन अर्ज केली तसेच दोन आरटीआय सुद्धा केली परंतु सर कुठल्याही न्यायबुद्धीत नसून त्यांनी मला माझ्या प्रकरणात कुठली मदत केलेली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे रखवालदार हे शब्द माझ्यासाठी तरी योग्य नाही आणि मला सरांनी न्याय न दिल्यामुळे योगेश पाटील सर माझ्यासाठी योग्य नाहीच नाही मी असेच म्हनेल कारण की एक गरीब विद्यार्थ्यांवर चार चार सेमिस्टर नियमितपणे फेल केलं जात आहे आणि सदर बाब ही विद्यापीठाच्या परीक्षेचे सर्व माननीय योगेश पाटील सरांच्या लक्षात आणून सुद्धा सरांनी माझ्या बाबत कुठली सहानुभूती दाखवली नाही जसे काही मी माणूस नव्हे एवढ्या आपला पदाचा दुरुपयोग गैरवापर करणे योग्य बाब नाही.