जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले. या दोन दिवसात अकादमीचे दोन स्कॉलर व दोन प्रतीथ यश कलावंतांचा सहभाग आहे. दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंदनेने झाली. दीपप्रज्वलन जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे सत्कार केले. या दोन दिवसीय महोत्सवाचे आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी केले.

प्रथम सत्र युवा आश्वासक नृत्यांगना नुपूर खटावकर व आर्या शेंदुर्णीकर या स्थानिक कलावंतांनी अप्रतिमरित्या सादर केलं. कथक नृत्य म्हटलं की ताल पक्ष हा आलाच त्याचे सौंदर्य नुपुरने उलगडून दाखवले. तसेच काही तुकडे, व तिहाई प्रस्तुत केले. त्यानंतर आर्याने एक अप्रतिम अशी कजरी सादर केली डॉ. प्रभा अत्रे यांची देस रागातील बंदिश कजरीच्या माध्यमातून पेश करण्यात आली.
त्यानंतर आर्या व लो पुरणे चतुरंग म्हणजे चार अंग अर्थात तरणा, सरगम, साहित्य आणि नृत्याचे बोल या चारही अंगांना एकमेकात सुंदर रित्या ओऊन तयार होतो तो चतुरंग “उदानी दानी दिम” हे तराण्याचे बोल तर तर “श्याम बजाये ऐसी मुरलिया” हे साहित्याचे बोल त्यांनी दाखवले. या नृत्याची सांगता नुपूर व आर्या दोघांच्या चतुरंगने झाली. रसिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे दुसरे सत्र स्कॉलर अनुभव खामरू याच्या शास्त्रीय गायनाने झाली. अभिनव ने राग चारुकेशी तसेच राग खमाज मधील एक ठुमरी सादर केली. अनुभवला तबल्याची साथ युवा तबलावादक तेजोवृष जोशी यांनी तर संवादिनी साथ अनंत जोशी यांनी केली.

तृतीय अर्थात समारोपाचे सत्र पं. रूपक कुलकर्णी यांच्या बासरी वादनाचे झाले. त्यांनी राग बागेश्री सादर केला. त्यानंतर राग देस मधली एक बंदिश व द्रुत तीन तालातील एक बंदिश सादर करुन रूपक कुलकर्णी यांनी आपल्या सत्राचा समारोप केला. त्यांच्यासोबत त्यांचा शिष्य लितेश जेठवा याने त्यांना बासरी तर तबल्याची साथ रवींद्र सिंह सोलंकी यांनी केली. बासरी वादनाने आयटीसी संगीत संमेलनाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट अनघा नाईक गोडबोले यांनी उत्तमरीत्या केले व कार्यक्रमाची रंगत वाढवली.
