Headlines
Home » जळगाव » स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे ‘पाडवा पहाट’  कार्यक्रमाचे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे ‘पाडवा पहाट’  कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बलिप्रतिपदा अर्थातच दिवाळी पहाट गेली २३ वर्षे स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान साजरी करीत आलेले असुन यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. ही प्रात:कालिन मैफल ठीक ६ वाजता महात्मा गांधी उद्यानात आयोजित करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी राष्ट्रीय कीर्तनकार, अनेक संगीत नाटकांमध्ये गायकांची भूमिका सादर करणारे प्रख्यात गायक पंडित चारुदत्त आफळे हे यंदाचे कलाकार असून त्यांना तबल्याची संगत रामकृष्ण करंबेळकर ऑर्गन ची संगत राहुल गोळे तर व्हायोलिनची संगत प्रमोद जांभेकर करणार आहेत.

या कार्यक्रमासाठी कै. नथ्थू शेट चांदसरकर ट्रस्ट तसेच भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन चे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, अशोक जैन व मेजर नाना वाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पहाटेच्या या मैफिलीत जळगावकर रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन प्रतिष्ठान ने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!