पृथ्वीवर अनेक समस्या आहेत. काही मानवनिर्मित तर काही समस्या निसर्ग निर्मित आहेत. प्रदुषण ही मानव निर्मित समस्या आहे. जिचे परीणाम मानवाला आणि पृथ्वीवरील संपुर्ण जीवसृष्टीला भोगावे लागत आहेत.
प्रदुषण हे तीन प्रकारे होते. हवा प्रदुषण .ध्वनी प्रदुषण.जलप्रदुषण
आता आजच्या भागात आपण हवा प्रदुषण या विषयावर लिहीणार आहोत. जसे की मोठमोठाल्या कारखान्यातुन दुषित वायु बाहेर पडतो , तसेच खाणकाम, विविध प्रकारच्या विट भट्टयांतुन निघणारा धुर इ. कारखान्यातुन निघणारा विषारी वायु असेल किंवा वाहनांचा धुर, कच्च्या रस्त्यावरून जाणारे वाहन त्याची धुळ यामुळे हवा ही प्रचंड दुषीत होते.अशे एक नाही तर अनेक कारणं हवेला दुषित करण्यास कारणीभुत आहेत. प्लास्टीक लवकर नष्ट होत नाही हे माहीती असुन देखील त्याला मुख्य रस्त्याच्या कडेला जाळतात प्रचंड घाणेरडा वास ,धुर त्यातुन निघतो. त्या धुराचा फार त्रास होतो. असे अनेक विषय आहेत, त्यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे झाडांची सर्रास चाललेली कत्तल . झाडे लावुन जगवायला अनेक वर्ष लागतात ,परंतु तोडायला खुप वेळ लागत नाही. वृक्षतोड थांबत नाही म्हणुन हवा शुध्द होत नाही ,जमीनीतील उष्णता वाढते ,पाण्याची पातळी खोल चाललेली आहे. मानवाने त्याच्या सुख सुविधांसाठी निसर्गाचे सगळे संतुलन बिघडवले आहे. हे मानवाच मानवालाच भोगावे लागणार यात काही शंका नाही. माणसाने निदान आपण मेल्यावर एक झाड आपण सोबत घेऊन जाणार आहोत या उद्देशाने जीवंतपणी एखादे झाड लावले तर फार मोठे उपकार या धरती मातेवर होतील . म्हणुन आपण नेहमीच म्हणतो झाडे लावा झाडे जगवा आपण सर्व लोक फार स्वार्थी झालो आहोत. आपण आपल्या पिढीसाठी मागे काहीच शिल्लक ठेवत नाही आहोत. सर्व प्राणी हे दुर्मिळ होत चालले आहेत , कारण मानवाचा दानव होत आहे. प्रचंड प्रमाणात जंगल तोड सुरु आहे. पशु पक्षी यांच्या प्रजाती नष्ट होताय. एवढेच नाही तर लोकांना देखील मोठ्या प्रमाणात आजार लागत आहेत. कारण हवा शुद्ध नाही, पाणी शुद्ध नाही, जिकडे पहावे तिकडे प्रदुषणच प्रदुषण आहे. आपण खुप अशी सार्वजनिक ठिकाणे बघितली सर्व ठिकाणी दुर्गंधी ,प्लास्टिक, घनकचरा, अस्वच्छता असे एक नाही तर हजार समस्या डोके वर काढुन बसल्या आहेत. लोकांना कमी वयात हृदय विकाराचा झटका येऊ लागला आहे. जीवनशैली पण खुप धावपळीची झाली आहे . हे सगळ मानवाने लवकर वेळेआधीच थांबवले नाही तर निसर्गाचा समतोल राखणे फारच अवघड जाईल आणि आपली जीवनशैली संपुर्णपणे विनाशाकडे जाईल, जी की आज चाललीच आहे. म्हणुन प्रत्येकाने एकतरी झाड लावा मग ते कुठेही लावले तरी हरकत नाही किंवा एखादे झाड आहे पण त्याला कुणी वाली नाही तर निदान एक बादली पाणी त्याला जरूर घाला, आणि आपण हे ही करत नसाल तर जे झाड आहे त्याला तरी निदान तोडु नका .आपण जे आपल्या हातात आहे तेवढ जरी केल तरी खुप बर होईल. कारण कोरोनासारख्या माहामारीमध्ये आपण आॕक्सीजनचे महत्व समजुनच घेतले आहे . ते परत सांगण्याची तशी गरज नाही. शेकडो लोक फक्त आॅक्सिजन मिळाला नाही म्हणुन मृत्युमुखी पडलेत. त्याचे महत्व काय आहे हे आपण जाणुन आहोत. म्हणुन हवेतील प्रदुषणाला आळा घालण्यासाठी आपल्याला फक्त झाडे लावा व झाडे जगवा हाच एक पर्याय आहे. बाकीचे पुढील अंकात…
श्रीमती भारती ज्ञानेश्वर कुमावत समांतर विधीसेवा सहाय्यक जळगाव.
अध्यक्षा ज्ञानभारती फाउंडेशन ,
समाजसेविका

खूप अनमोल मार्गदर्शन केले आहे…प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे. प्रदूषण मुक्त भारत व्हायला पाहिजे.