Headlines
Home » जळगाव » ‘कर्म सारी दुनियां का हिसाब रखता है : प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा.

‘कर्म सारी दुनियां का हिसाब रखता है : प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा.

      || आत्मोत्कर्ष वाणी ||
‘कर्म ना कागज रखता है, ना किताब रखता है, पर सारी दुनियां का हिसाब रखता है।’ कर्म कुणीही असो, कुणालाच सोडत नाही. या भौतिक जगात जगणारे सर्व भूतकाळाचा नव्हे तर फक्त वर्तमानाचाच विचार करत असतात. ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी हाताची मुठ बंद असते, मृत्यू होतो त्यावेळी दोन्हीही हात रिते असतात, खुले असतात. बंद मुठ म्हणजे पूर्वजन्मीचे कर्म आणि त्याचे परिणाम घेऊन जन्माला येतो. मृत्यूनंतर कुणीही काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही.

यावेळी जगज्जेता सिकंदरचे याचे चपखल उदाहरण देण्यात आले. संपूर्ण जग त्याने जिंकले परंतु मृत्यूनंतर त्याला काहीही सोबत नेता आले नाही. हा संदेश जगाला देण्यासाठी त्याने अंतिम इच्छा अशी व्यक्त केली होती की, अंतिमसंस्कारासाठी शव नेत असताना मोकळे, रिते हात दिसतील असे ठेवा की ते लोकांना दिसतील. कुणीही सोबत काही नेत नाही सोबत जातात त्याने केलेले कर्म! व्यक्तीच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते त्याला आपले स्वतःचे कर्मच जबाबदार असतात. हा अत्यंत मोलाचा संदेश सुमधूर गितांच्या माध्यमातून प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा. यांनी तर आस्तिक, नास्तिक तसेच सुदेव, सुगुरू आणि सुधर्म या सह ‘संकीत के ६७ बोल’ यावर प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी सोदाहरण उदाहरणे देऊन उपस्थित श्रावक-श्राविकांना समजावून सांगितले.

आपल्या प्रवचनात संकीत के ६७ बोल याबाबत पुढील प्रवचनात सविस्तर सांगण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  जैन धर्मातील संकीत के ६७ बोल हे मोक्षमार्ग समजण्यासाठी आचार्यांनी सूत्ररूपात दिलेले आहेत. यात नवरस (जीव, अजीव, पुण्य, पाप, आस्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष), हे बोल आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतात. शरीर आणि आत्मा हे विभिन्न आहेत हे समजून घेण्यासाठी जिनवाणी श्रद्धापूर्वक ऐकावी असे आवाहन देखील प्रवचनातून करण्यात आले.
सप्टेंबर ०८: २०२५
जळगांव – महाराष्ट्र.
(शब्दांकन – किशोर कुळकर्णी )

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!