जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या वसतिगृहात यंदाचा गणेशोत्सव रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यावर्षी गणेशोत्सवाच्या अध्यक्षपदी तेजस्विनी रविंद्र पाटील यांची सलग तिसऱ्यांदा लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन निवड करण्यात आली.
या गौरवशाली क्षणी रेक्टर संजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय जाहीर झाला. सलग तीन वेळा अध्यक्षपद भूषवण्याचा मान पटकावणारी तेजस्विनी ही या वसतिगृहातील नेतृत्वक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे. तसेच उपाध्यक्ष दिव्या पाटील, खजिनदार आस्मिता पाटील, सचिव नेहा जैन, तर सदस्यांमध्ये आदिती राणे, भूमिका बागुल, प्रेरणा तुडे, नंदिनी पवार, जागृती गिरीशे यांचा समावेश आहे.
या वर्षी ही विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांतून विद्यार्थिनींच्या कलागुणांना व नेतृत्वक्षमतेला वाव मिळणारे हे अमूल्य व्यासपीठ मिळणार आहे. रक्तदान शिबिर, ग्रामस्वच्छता, महिला सशक्तीकरण व जनजागृती मोहिमा यांसारखे सामाजिक उपक्रम या काळात राबवले जात आहेत. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून साकारन्यात येणारी सजावट नक्कीच लक्षवेधी ठरेल .
