जळगाव , दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज) – जळगाव शहरातील प्रभाग १ मधील कॉलनी स्थित असलेल्या जळगांव जिल्हा दूध उत्पादक संघ परिसरात मागील काही दिवसांपासून अतीदुर्गंधी पसरली आहे. यामुळे राधाकृष्ण नगर, इंद्रप्रस्थ नगर, महावीर नगर, सत्यम पार्क, राजमालती नगर इतर कॉलनी परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे .
सविस्तर वृत्त असे की जळगांव जिल्हा दूध उत्पादक संघाचे वेस्टेज पाणी तेथील गटारीत साचून राहते , यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्याबाबतचे निवेदन आज दि.१३ रोजी मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांना देण्यात आले .
परिसरातील नागरिकांनी आरोग्य अधिकारी यांच्यासोबत या समस्येवर चर्चा केली .आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या विषयाकड़े त्वरीत लक्ष देऊन दोन दिवसात यावर योग्य ती कार्यवाही केली नाही तर जिल्हा दुध उत्पादक संघाच्या गेट समोर परिसरातील नागरिकांचा वतीने तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा नागरिकांनी दिला आला. निवेदन देते वेळी विजय सुरवाडे (सामाजिक कार्यकर्ते), ऍडव्होकेट निलेश जाधव, नितीन भाऊ मोरे (सामाजिक कार्यकर्ते), शुभम घाटे (सामाजिक कार्यकर्ते), खुशाल सोनवणे, प्रतीक सपकाळे, कांबळे तसेच प्रभाग १ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
