जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲड रिसर्च जळगांव तर्फे एमबीए च्या प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म भरणे, कागदपत्रांची पडताळणी व स्कॅनिंग तसेच जमा करणे अशा सुविधांची पूर्तता विद्यार्थ्यांसाठी निशुल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सकाळी ९ ते ५ च्या दरम्यान इन्स्टिट्यूटला भेट द्यावी.
मुळ कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रियेची मुदत २८ जून ते ८ जुलै २०२५, तर कागदपत्रांची (मुळ) पडताळणी ३० जून ते ९ जुलै या कालावधीत होईल. अधिक माहितीसाठी एमबीए विभाग प्रमुख डॉ. पराग नारखेडे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन संचालक डॉ. बी.व्ही. पवार यांनी केले आहे.
