Home » जळगाव » मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग द्वारा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम उत्साहात

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग द्वारा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय जळगाव आणि मू.जे. स्वायत्त महाविद्यालय जळगावच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक धरती एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ७ ते ९ या वेळात महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सं.ना. भारंबे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शास्त्री नयन प्रकाशदास स्वामीनारायण मंदिर जळगाव, प्राचार्य अशोक राणे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव, केसीई सोसायटीचे कोषाध्यक्ष डी.टी. पाटील, व्यवस्थापन मंडळाचे संचालक संजय प्रभूदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षी पतंजली आणि ओंकार प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. विनोद ढगे आणि त्यांच्या समूहाने याप्रसंगी महाराष्ट्र गीत सादर केले. डॉ. देवानंद  सोनार यांनी प्रास्ताविकातून योग दिनाचा उद्देश आणि सोहम योग विभागाची आजपर्यंतची वाटचाल यावर प्रकाश टाकला.  अतिथींच्या सत्कारानंतर प्रा. ज्योति वाघ यांच्या मार्गदर्शनात उपस्थित सर्व योगसाधक आणि विद्यार्थ्यांकडून सामूहिक योग साधना करून घेण्यात आली.

शास्त्री नयनप्रकाशदास यांनी रोजच्या जीवनशैलीमध्ये योगाभ्यासाचा अंतर्भाव करून आपले शारीरिक मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आजच्या दिवशी संकल्प करून तो पूर्णत्वास न्यावा असा संदेश दिला. संजय प्रभू देसाई यांनी मी स्वतःही योग करतो आणि आपण सुद्धा नियमितपणे योगाभ्यास करावा असा संदेश आपल्या शुभेच्छापर मनोगतातून दिला. कार्यक्रमानंतर मलबार ज्वेलर्स अँड डायमंड शाखा जळगाव यांच्या वतीने उपस्थितांना सुंदर रोपट्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर यांनी केले तर आभार व शांतीपाठ डॉ. देवानंद सोनार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला केसीई सोसायटी संचालित विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, योगसाधक आणि एनसीसी कॅडेटस असे सुमारे १००० विद्यार्थी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणिता झांबरे मुख्याध्यापिका ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय,  सुषमा कंची प्राचार्य ओरियन सी.बी.एस.ई. स्कूल,  श्रीधर सनकरे प्राचार्य ओरीयन स्टेट बोर्ड स्कूल, विनोद ढगे केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय जळगाव, मलबार ज्वेलर्स अँड डायमंड यांचे सहकार्य लाभले.  सोहम योग विभागातील प्रा. पंकज खाजबागे , प्रा. ज्योति वाघ, प्रा. श्रद्धा व्यास, एम.ए. योगशास्त्र, बी. ए. योगशास्त्र, योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!