Headlines
Home » जळगाव » जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग जी वैयक्तिक कल्याण आणि सामुदायिक आरोग्यासाठी आणि पर्यावरण स्थिरतेसाठी योगाच्या सर्वांगीण उपयोगितेवर भर देत आहे. या थीमनुसार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक योगासन करण्याचा अनुभव घेतला. आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार योगामुळे मनाला मिळणारी स्थिरता आणि शरीराला मिळणारी स्वस्थता या दोन्ही बाबींचे विद्यार्थ्यांना विशेष महत्त्व कळले.

विद्यार्थी जीवनात शैक्षणिक विकासासाठी शरीर आणि मन यांच्या जोडीला पर्यावरण यांचा योग्य संवाद साधण्यासाठी आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये योगाचे किती महत्त्व आहे हे स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. अष्टांग योगाचे महत्त्व देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप-प्राचार्या मेघना राजकोटिया यांच्या सहकार्याने शिक्षकांनी योग सत्राचे आयोजन केले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्सुकतेने सहभाग नोंदवला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!