Headlines
Home » जळगाव » भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे संपन्न

भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महापुरुषांच्या समता स्वातंत्र्य बंधुता न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये २५००० नेतृत्व निर्माण करण्यासाठी आज संपूर्ण देशभरामधील ३१ राज्यामध्ये विद्यार्थ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्याचाच भाग म्हणून जळगाव मध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.

सदर प्रशिक्षणाचे उदघाटक निवृत्त उपशिक्षण अधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी केले, तर सदर प्रशिक्षण उत्तर प्रदेशातून आलेले सिद्धांत मौर्या यांनी दिले. या प्रसंगी २५ हजार रु. जनआंदोलन निधी सिद्धांत मौर्या सर यांना सुपूर्द करण्यात आला. साई विलास चिकणे या विद्यार्थ्याने आपल्या खाऊंचे ५० रुपये डिंपल या विद्यार्थिनीने ५० रुपये व डॉ. शाकीर शेख यांनी ५०० रुपये जनआंदोलन निधी दिला.
सूत्रसंचालन जितेंद्र भोसले यांनी, प्रास्ताविक पूनम भोईर यांनी तर आभार विलास साबळे यांनी मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!