पुणे ( वास्तव पोस्ट ) : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा ओ.बी.सी. सेल अध्यक्षपदी तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते, खान्देश माळी मंडळाचे सदस्य, खान्देश विकास प्रतिष्ठान चे प्रशांत भास्कर महाजन यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य ओ.बी.सी.सेल. अध्यक्ष कल्याणराव आखाडे, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, मा.आमदार विलास लांडे, मा. महापौर योगेश बहल, कविता आल्हाट, प्रदेश कार्याध्यक्ष सचिन आवटे, मा.नगरसेवक प्रकाश सोमवंशी, नाना काटे, प्रशांत शितोळे, कांबळे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशांत महाजन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. नियुक्ती नंतर महाजन यांनी पक्षासाठी झोकून काम करु राज्यातील, व देशातील सर्वात मोठ्या असलेला ओबीसी समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे ध्येय धोरणे पोहचवू असे सांगितले. या निवडीनंतर प्रशांत महाजन यांच्यावर पिंपरी चिंचवड भागातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रशांत महाजन हे जळगाव जिल्ह्यातील म्हसावद या गावाचे मूळ रहिवासी असून त्यांची जळगाव तसेच एरंडोल, धरणगाव या तालुक्यात “भाऊ महाजन” या नावाने एक ओळख आहे.
