Home » जळगाव » एम.पी.एड. अभ्यासक्रम प्रवेशासाठी ८४ विद्यार्थ्यांनी दिली मैदानी परीक्षा

एम.पी.एड. अभ्यासक्रम प्रवेशासाठी ८४ विद्यार्थ्यांनी दिली मैदानी परीक्षा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे घेण्यात आली. सदर सामायिक परीक्षा ही एम.पी.एड. या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी होती. एम.पी.एड या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची सर्वप्रथम अर्जाची छाननी व आय कार्ड तपासण्यात आले. त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने मैदानी परीक्षा (फिल्ड टेस्ट) घेण्यात आली.

शटल रन, सीट अँड रिच टेस्ट, स्टॅंडिंग ब्रोड जंप, मेडिसिन बॉल थ्रो, सीट अप टेस्ट इत्यादी मैदानी टेस्ट घेण्यात आली. मैदानी परीक्षा देण्यासाठी एकूण १०९ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला होता. त्यापैकी ८४ विद्यार्थी मैदानी परीक्षेसाठी उपस्थित होते. या परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे आणि डॉ. बेलोरकर यांचे मार्गदर्शन लाभले.  यावेळी उपप्राचार्य केतन चौधरी, प्रा.प्रवीण कोल्हे, प्रा.आकाश भिवाल आणि परिक्षक तसेच मोहन चौधरी, गोविंदा रायचंदे, विजय चव्हाण, केतन पाटील यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!