Home » जळगाव » जळगाव येथे लवकरच हैद्राबाद , मोपा (गोवा) पुणे विमानसेवा सुरु होणार

जळगाव येथे लवकरच हैद्राबाद , मोपा (गोवा) पुणे विमानसेवा सुरु होणार

जळगाव दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज )- जळगाव शहरातील नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण खान्देशसाठी ही आनंदाची बाब आहे .भारत सरकारच्या प्रादेशिक उडान योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात लवकरच हैद्राबाद, मोपा (गोवा) आणि पुणे येथे विमान सेवा सुरू होऊ शकते , असे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या @JalgaonDM या एक्स अकॉउंटवर पोस्ट करण्यात आले आहे.

त्यात म्हटले आहे की , हैदराबादला जाणारी विमानसेवा जळगावच्या प्रवाशांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास नेटवर्कमध्ये प्रवेश मिळवून देईल. तर, गोव्याला हवाई प्रवास सेवा आम्हाला मोठ्या संख्येने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक आणेल. जळगावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने पुण्यात शिकतात आणि अनेक जळगावकर पुण्यात नोकरी करतात. ते त्यांना त्यांच्या घराच्या जवळ आणेल. ही विमानसेवा सुरु झाल्यास जळगावकरांसाठी खरोखरच अभिमानास्पद बाब ठरणार .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!